दिपक शिंदे 9970406716
मध्यप्रदेशमध्ये धावत्या बिलासपूर-बिकानेर एक्स्प्रेस ट्रेनला आग; प्रवाशांमध्ये खळबळ
भोपाळ :- छत्तीसगडच्या बिलासपूरहून राजस्थानच्या बिकानेरमध्ये जाणाऱ्या बिलासपूर-बिकानेर एक्स्प्रेस ट्रेनला रविवारी आग लागल्याची घटना घडली. बघता बघता आगीचे लोट हवेत पसरू लागले. धावत्या ट्रेनला आग लागल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये खळबळ उडाली. धावत्या ट्रेनला आग लागल्याचे दिसताच गार्डने एक्स्प्रेसला मध्यप्रदेशमधील उज्जैनजवळ थांबवली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी ज्या कोचला आग लागली, तो कोच वेगळा केला.
तथापि, काही वेळाने जळणारा डबा वेगळा करण्यात आला आणि ट्रेन रवाना करण्यात आली. तराणा रोड स्टेशन मास्तरांनी सांगितले की आग विझवण्यात आली आहे. कोणत्याही प्रवाशाला कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही. आग लागली तेव्हा ट्रेन काली सिंध नदीच्या पुलावर होती. आगीची माहिती मिळताच ग्रामस्थही घटनास्थळी पोहोचले. गावकरी मुकेश रावल यांनी सांगितले की, काली सिंध नदीवरील पुलावर असताना ट्रेनला आग लागली. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांसह पाण्याचा आणि इतर मार्गांनी पॉवर कोचमधील आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले.