दिपक र. शिंदे 9970406816
ठाणे लोकसभा संपर्कप्रमुखपदी मनोज शिंदे
शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान
ठाणे, ता.०५ (प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीनंतर कुठल्याही पदाची अभिलाषा न बाळगता बिनशर्त आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलेले काँग्रेसचे माजी ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज तुकाराम शिंदे यांची शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ठाणे लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. मनोज शिंदे यांचे त्रिवार अभिनंदन करून ना. एकनाथ शिंदे यांनी, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचारआणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा आपण सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रोत्साहित केले.
डॅशिंग नेते मनोज शिंदे यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर बराच कालावधी उलटल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज शिंदे यांच्या शिरावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख पदी नियुक्ती केली आहे. पक्षाने सोपवलेल्या या नविन जबाबदारीचे निष्ठेने योग्य तऱ्हेने पालन करण्याचा निर्धार मनोज शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रीयपणे प्रचार आणि प्रसार करणार असुन शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करणार असलाचा विश्वास मनोज शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांनी, प्रत्येक महिन्यात किमान दोन संपर्क दौरे करण्याच्या सुचना दिल्या असून या संपर्क दौऱ्याचा दरमहा अहवाल शिवसेनेच्या बाळासाहेब भवन येथे देण्यात यावा. अशी सूचनाही संजय मोरे यांनी मनोज शिंदे यांना केली आहे.