Deepak Shinde 9970406816
स्वतःच्याच बंदुकीतील गोळी लागून मृत्यू
शिकारीसाठी गेलेल्या तरुणाला स्वतःच्याच बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. माणगाव तालुक्यातील कवळीचा माळ येथील जंगल भागात शनिवारी ही घटना घडली.
माणगाव तालुक्यातील पाणोसे आदिवासी वाडीजवळील कवळीचा माळ येथील जंगल भागात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मधुकर सखाराम वाघमारे (३२) हा त्याच्या ताब्यातीलबेकायदा बंदूक घेऊन शिकारीसाठी झाडावर बसला होता. तो झाडावरून खाली उतरत असताना, त्याच्याकडील बंदूक त्याच्या हातून खाली जमिनीवर पडली. ती जमिनीवर पडताच बंदुकीतून गोळी सुटून तरुणाच्या पाठीमागील बाजूस लागली. त्यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती संजय नथु कोळी यांनी दिली असून माणगाव पोलिसांकडून मधुकर वाघमारे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.