दिपक शिंदे : 9970406816
महायुतीच्या राजेश बेंडल यांच्या प्रचारात रिपब्लिकन आठवले पक्ष मैदानात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) तालुका गुहागर या रिपब्लिकन पक्षाची बैठक शृंगारतळीमधील गुहागर बाजार येथील माजी आमदार, स्व. रामभाऊ बेंडल सभागृहात २६४ गुहागर विधानसभा निवडणुकीत गुहागर तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आणि आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते, नामदार रामदास आठवले यांचा आदेश या विषयावर तालुका अध्यक्ष संदिप कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच पार पडली. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महायुतीचे उमेदवार माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्या प्रचारात रिपब्लिकन पक्ष (आठवले) अग्रस्थानी राहणार असून राजेश बेंडल यांच्या विजयात रिपब्लिकन मतांचा सिंहाचा वाटा असून गुहागर तालुक्यातील रिपब्लिकन (आठवले) पक्षाचे वतीने जिल्हा उपाध्यक्ष विजू आप्पा कदम, जिल्हा सदस्य मारुती मोहिते, गुहागर तालुका अध्यक्ष संदिप कदम, तालुका उपाध्यक्ष सुरेश जाधव, तालुका चिटणीस दशरथ पवार, तालुका सरचिटणीस सुनिल गमरे, तालुका संघटक आणि जेष्ठ मार्गदर्शक भिमसेन सावंत, तालुका’प्रवक्ता शशिकांत जाधव, तालुका युवक अध्यक्ष आणि युवकांचेप्रेरणास्थान विजय असगोलकर, सचिन मोहिते, तसेच सोशल मीडिया व आयटी सेलचे गुहागर तालुका अध्यक्ष संदेश कदम आदी. पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होते. शिवसेना, भाजपा, आर.पी.आय., राष्ट्रवादी (अजित पवार), आणि बळीराज सेना आदी. महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल यांना विक्रमी मतांनी निवडून आणणारच असा निर्धार रिपब्लिकन (आठवले) पक्षाच्या युवक, बेसिक आणि सोशल मीडिया व आयटी सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला.