Saturday, April 19, 2025
spot_img

Latest Posts

एफडिए ची धडक कारवाई : मिस्वाक दंतमंजन अडचणीत

दिपक शिंदे : चिपळूण || मिसवाक दंतमंजनवर एफडीएची कारवाई

४१ लाखांचा साठा जप्त

मिसवाक दंतमंजनचा वापर केल्याने दात व हिरड्यांमधील दाह कमी होतो, अशी जाहिरात डाबर कंपनीकडून करण्यात येत होती. ही जाहिरात नियमभंग करणारी असल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) २३ ऑक्टोबर रोजी डाबर कंपनीच्या या उत्पादनावर कारवाई केली. या कारवाईमध्ये मिसवाक दंतमंजनाचा ४१ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची तपासणी करण्यात येत आहे.

कंपनीकडून खोटी प्रसिद्धी आणि नागरिकांची दिशाभूल करण्यात येत असल्याबद्दल ऑल फूड अॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. अभय पांडेय यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने २३ ऑक्टोबर रोजी कंपनीच्या भिवंडी येथील गोदामामध्ये छापा मारला. गोदामामधील छाप्यात जप्त केलेल्या साठ्याचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर कंपनीवर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जनतेच्या विश्वासाला तडा देण्याचे काम कंपनीकडून होत होते. यामुळे उत्पादनाचा वास्तविक उद्देश आणि फायद्यांबद्दल नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. सौंदर्य प्रसाधने आणि औषध उत्पादनांशी संबंधित नियमावली सुनिश्चित करण्याची आवश्यकता असली पाहिजे, अशी मााहिती ऑल फूड अॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अॅड. अभय पांडेय यांनी दिली.

Latest Posts

spot_imgspot_img

Don't Miss

Stay in touch

To be updated with all the latest news, offers and special announcements.