Deepak Shinde 9970406816
सुशासन सप्ताह / Good Governance Week
दिनांक 19/12/2024 ते 24/12/2024
केंद्र सरकार यांचेकडील सुचनानुसार राज्यशासनाने दिनांक 19/12/2024 ते 24/12/2024 या कालावधीमध्ये सुशासन सप्ताह / Good Governance Week साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
त्यानुसार चिपळूण तहसिलदार कार्यालयामार्फत नागरिकांना देण्यात येणा-या विविध प्रकारच्या सेवा यामध्ये दिनांक 19/12/2024 ते 23/12/2024 या कालावधीमध्ये प्रतिज्ञापत्र-260, उत्पन्न दाखले- 76, वय अधिवास दाखले-22, रहिवासी दाखले-12, डोंगरी दाखले-4, EWS दाखले 2 शेतकरी दाखले-1, अल्पभूधारक दाखले-3, नवीन शिधापत्रिका वाटप-124, रेशनकार्डमधील नाव कमी करणे-102, 18+आधारकार्ड मान्यता दिलेले-6, सातबारा वाटप-637, फेर फार वाटप 149, आठ-अ-184, फेरफार नोंदी निकाली-27 अशा एकूण 1371 तहसिल कार्यालय, चिपळूण मार्फत सेवा पुरविण्यात आलेल्या आहे.
तसेच दिनांक 21/12/2024 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण व तहसिल कार्यालय, चिपळूण या कार्यालयाचे आस्थापनेवरील सर्व कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांना मा.श्री.डॉ. संजय कुंडेटकर, सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी यांचे मार्फत महसूल विषयक बाबींचे प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षणासाठी 122 अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.