दिपक शिंदे : 9970406816
मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम 2-अ (4) (6) नुसार सन 2025 ते 2030 या कालावधीमध्ये मुदत संपणा-या चिपळूण तालुक्यातील सार्वत्रिक निवडणूका लक्षात घेऊन मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांचेकडील अधिसूचना आदेश क्र./जिकार/ कार्या-3/ग्रापंनि/सरपंच आरक्षण/2025 दिनांक 11/04/2025 अन्वये चिपळूण तालुक्यातील 130 ग्रामपंचायतीची सरपंच पदे आरक्षित करणेची आहेत. या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडत कार्यक्रम दिनांक 22/04/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे घेणेत येणार आहे. तरी इच्छुक ग्रामस्थांनी आरक्षण सोडतीच्या दिवशी व वेळी उपस्थित रहावे.
