दिपक शिंदे 9970406816
वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी महोत्सवाचे दि. ५ रोजी शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन
कृषी महोत्सवाची जय्यत तयारी; भरगच्च कार्यक्रमांचे आयोजनरक्तदान शिबिर व प्रशांत यादव यांचा सुवर्ण महोत्सवी अभिष्टचिंतन कार्यक्रम मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांची माहिती
चिपळूण (प्रतिनिधी):— वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. आयोजित कृषी व पशुधन कृषी महोत्सवास गेल्या वर्षी मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षी देखील कृषी महोत्सव दिनांक ५ ते ९ जानेवारी दरम्यान चिपळूण बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर मैदानात आयोजित करण्यात आले आहे. या महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन झाले असून या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
गेल्या वर्षी वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने आयोजित केलेल्या कृषी महोत्सवाला उदंड प्रतिसाद मिळाला होता. या महोत्सवातून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायांसाठी दिशा मिळाली आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्या त पशुधन वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एकंदरीत वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाने उचललेले पाऊल सकारात्मक ठरत असल्याचे पहावयास मिळत आहे. यावर्षी देखील कृषी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
*कृषी महोत्सवाचा ५ रोजी भव्य उद्घाटन सोहोळा*
या महोत्सवाचे उद्घाटन दिनांक ५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता केंद्रीय माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू संजय भावे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी रक्तदान शिबिरदेखील आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ५.३० वाजता माऊली रिंगण सोहोळा तर ७.३० वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव यांचा सुवर्ण महोत्सवी अभिष्टचिंतन कार्यक्रम होणार आहे.
*पशुधन, डॉग व कॅट शो व पाककला स्पर्धा*
दिनांक ६ रोजी सकाळी १०.०० वाजता सुदृढ, निरोगी, सुंदर, पशुधन स्पर्धा होईल. तसेच सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत डॉग शो होणार आहे. या स्पर्धेतील डॉग व कॅट शो मालकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दिनांक ७ जानेवारी रोजी गोड पदार्थ पाककला सकाळी १० ते २ वाजेपर्यंत कॅट शो सायंकाळी ४.३० ते ६.३० वाजेपर्यंत ८ जानेवारी सकाळी ८ वाजता सर्वात जास्त दूध देणारी गाय, म्हैस सकाळी १०.३० वाजता शेतकऱ्यांना प्रशिक्षण सकाळी ११.०० वाजता पशुधन कोकण कपिला स्पर्धा आणि ९ रोजी सकाळी १० ते २ तिखट पाककला स्पर्धा होईल.
या प्रदर्शनात कॅफेटेरिया, २४ तास जनरेटर सुविधा, भव्य पार्किंग व्यवस्था, टॉयलेट्स फायर स्टेशन सुविधा असणार आहे व्यवस्थापन कार्यालय असून कोणाचीही गैरसोय होणार नाही, याकडे विशेष लक्ष असणार आहे.
खते, जैविक खते आणि शेतीच्या नवीन पद्धती,कृषी अवजारे, यंत्रे, कृषीविषयक अत्याधुनिक साहित्य वि-बियाणे, कृषी रसायने (जंतुनाशके, किटकनाशके, पीकवाढीसाठी उपयुक्त रसायने इत्यादी), फळ व फुले उत्पादन संबंधीत विविध पद्धती व आधुनिक तंत्रज्ञान अत्याधुनिक फवारणी यंत्रे (ठिबक सिंचन, फवारा पंपसेट, स्टार्टर इ.), अत्याधुनिक हायटेक कृषी विभाग (ग्रीन हाऊस, मशरूम उत्पादन, अॅक्चॉकल्चर, वायोटेक्नॉलॉजी, टिश्यू कल्चर वैगरे) ग्रीनहाऊस उभारणी, शेततळे व्यवस्थापन अशा संस्था सहभागी होणार आहेत.
या प्रदर्शनात १०० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असून चर्चासत्रासाठी विशेष कक्ष, पशु पक्षी व प्राणी प्रदर्शन तर जनावरांचा गोठा विशेष आकर्षण असणार आहे. प्री फॅब्रिकेटेड स्टॉल्स, वैविध्यपूर्ण अवजारे, मान्यवरांच्या भेटी व मार्गदर्शन असणार आहे. पिलरलेस दोन शामियान परदेशी भाजीपाला या प्रदर्शनात असून विविध मनोरंजनाचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. एकंदरीत भव्य प्रदर्शन असून शेतकऱ्यांना या प्रदर्शनाचा मोठा लाभ होणार आहे.