दिपक शिंदे 9970406816
मधुमेहींसाठी अपरांत येथे इन्फीगोद्वारे दृष्टीपटल तपासणी शिबिराचे आयोजन.
अपरांत हॉस्पिटल, चिपळूण येथे इन्फीगो आय केअर खेड द्वारे दिनांक 14 डिसेंबर .रोजी .सकाळी 10 ते 2 या वेळात नेत्र(दृष्टिपटल) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये सुप्रसिद्ध नेत्र तज्ञ डॉक्टर प्रसाद कामत यांचे द्वारे सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेमध्ये तपासणी करण्यात येणार आहे. डॉक्टर कामत हे शंकर नेत्रालय चेन्नई येथून विशेष प्रशिक्षित रेटिना स्पेशालिस्ट असून त्यांनी आतापर्यंत एक लाखाहून अधिक रुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले असून 25000 हून अधिक गुंतागुंतीच्या अवघड शस्त्रक्रिया त्यांनी केले आहेत.
मधुमेह (डायबेटीस) हा दीर्घकालीन आजार आहे ज्याचा परिणाम शरीराच्या विविध अवयवांवर होतो, विशेषतः डोळ्यांवर. डायबेटिक रेटिनोपॅथी हा मधुमेहामुळे होणाऱ्या नेत्ररोगांपैकी प्रमुख आजार आहे. योग्य उपचार न झाल्यास, यामुळे अंधत्व येऊ शकते.
त्याचबरोबर चाळिशी मधील मधुमेहींना डोळ्यातील प्रेशर वाढणे, पडदा सरकणे पडद्याला सूज येणे, अचानक नजर कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. अशा रुग्णांनी दरवर्षी किमान एकदा नेत्र तपासणी गरजेचे ठरते.
मधुमेहींनी कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवल्यास डोळ्यांचे आजार व नुकसान टाळता येऊ शकते यासाठी अपरांत हॉस्पिटलचे कन्सल्टंट फिजिशियन डॉ.हर्षद होन यांचे द्वारे शिबिरार्थींना मोफत तपासणी व मार्गदर्शन दिले जाणार आहे.
मधुमेहीं साठी फिजिशियन व नेत्ररोग तज्ञ यांचे द्वारे तपासणी एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने हे शिबिर वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. तरी नोंदणी करिता 8380860136 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.