दिपक शिंदे 9970406816
भारतीय जनता पक्षाच्या चिपळूण तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी विनोद भुरण यांची निवड –
भाजपा चिपळूण तालुका अध्यक्षपदी विनोद भुरण यांची नियुक्ती
भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 963 मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकणामध्ये सर्व मंडल अध्यक्षांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. याच अनुषंगाने चिपळूण ग्रामीण पूर्व मंडलाच्या अध्यक्षपदी खेर्डी गावचे सुपुत्र माजी उपसरपंच विद्यमान सदस्य श्री. विनोद भुरण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिपळूण येथील मीरा हॉटेल येथे अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला. चिपळूण ग्रामीण मंडळाचे मावळते अध्यक्ष श्री.वसंत ताम्हणकर यांनी आपल्या कार्यकाळामध्ये पक्ष संघटन वाढीकरिता मेहनत घेतली. त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये यशस्वी काम केले. अशाच पद्धतीने येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळण्याकरिता भारतीय जनता पार्टीने विनोद भुरण यांच्या खांद्यावरती अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. येणाऱ्या काळामध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पक्ष संघटन वाढीकरिता मी प्रयत्नशील राहीन आणि तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळण्याकरिता सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करेन असे मत यावेळी विनोद भुरण यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस तथा निरीक्षक सतेज नलावडे, भाजपा जिल्हा पदाधिकारी तथा निरीक्षक राजू भाटलेकर, भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्राताई चव्हाण, भाजपा पूर्व तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, जिल्हा उपाध्यक्ष आशिष खातू व्यासपीठावर उपस्थित होते तसेच चिपळूण तालुक्यातील आणि शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

