दिपक शिंदे : चिपळूण
भारताला मालिका विजयाची संधी: आफ्रिकेविरुद्ध आज अखेरचा सामना रंगणार –
: विश्वविजेत्या भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका जिंकण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. बुधवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यात ११ धावांनी विजय मिळवून सूर्यकुमार यादवच्या भारतीय संघाने करंडक स्वीकारण्याच्या दिशेने हात उंचावले आहेत.शतकवीर तिलक वर्मा आणि अंतिम क्षणी निर्णायक गोलंदाजी करणारा अर्शदीप सिंग यांच्यामुळे भारताल तिसऱ्या सामन्यात २१८ धावा केल्यानंतर ११ धावांच्या विजयाचे समाधान लाभले होते, मात्र भारत ही मालिका गमावणार नाही, हे निश्चित झाले आहे. उद्याचा हा निर्णायक सामना जोहान्सबर्गच्या ऐतिहासिक वाँडरर्स स्टेडियमवर होणार आहे. याच स्टेडियमवर भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ मध्ये पाकिस्तानला हरवून पहिल्या वहिल्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवले
भारत-दक्षिण आफ्रिका : चौथा टी-२० सामना
वेळ : रात्री ८.३० पासून
थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ आणि जिओ सिनेमा
होते. इतकेच नव्हे तर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेतील अगोदरच्या मालिकेत याच मैदानावर शतकी खेळी केली होती. त्यामुळे है मैदान भारतासाठी नशिबवान आहे.
रोहित शर्माकडून टी-२० प्रकारात भारतीय संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या सूर्यकुमारच्या विजयाची सरासरी उत्तम आहे. १६ पैकी १३ सामन्यात विजय मिळवताना त्याची विजयाची सरासरी ८१.२५ इतकी आहे.गतवेळच्या आफ्रिका दौऱ्यातील मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली होती. यातील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.