𝓓𝓮𝓮𝓹𝓪𝓴 𝓢𝓱𝓲𝓷𝓭𝓮 9970406816
प्रशांत यादव यांच्या पुढाकाराने देवरुख आगार दत्त मंदिराचे सुशोभीकरण सुरू
“लढणारे इतिहास रचतात” असे प्रत्यक्ष कृतीत दाखवणारे प्रशांत यादव निवडणूक संपल्यावरही कामाचा झपाटा कायम ठेवून जनतेला आपल्या कार्यक्षमतेचा अनुभव देत आहेत. याचा ताजा प्रत्यय देवरुख आगारातील दत्त मंदिराच्या सुशोभीकरणाच्या कामातून आला आहे.
देवरुख आगारातील दत्त मंदिर हे एसटी कामगार व भक्तांसाठी श्रद्धेचे ठिकाण आहे. मात्र, गेल्या 15 वर्षांपासून या ठिकाणी पावसाळ्यात होणाऱ्या पाण्याच्या त्रासामुळे भक्तांच्या व कामगारांच्या मनात यासंदर्भात काहीतरी उपाययोजना होण्याची इच्छा होती. खर्चिक स्वरूपामुळे हा प्रकल्प अडून राहिला होता. अखेर राजू शेठ घोसाळकर यांनी या प्रश्नाला गांभीर्याने घेत प्रशांत यादव साहेबांकडे हा प्रस्ताव मांडला, आणि यादव यांनी तत्काळ होकार देत या कामाला गती दिली.
सध्या सुशोभीकरणाचे काम जोरात सुरू असून, प्रसिद्ध ठेकेदार प्रदीप जागुष्टे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या देखरेखीखाली प्रकल्प राबवला जात आहे. या उपक्रमासाठी राजू शेठ घोसाळकर यांना चिपळूणचे वैभव चव्हाण, रोहन नलावडे, सचिन नलावडे, तसेच देवरुखमधील संजय वेल्हाळ, काशिनाथ अणेराव, विलास जाधव, बंड्या पवार, मिलिंद सोनवडेकर, समीर शिंदे, प्रवीण रेवणे, सलीम साटविलकर, विलास शेळके व इतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय मदत केली.
देवरुख आगार प्रमुख रेश्मा मधाळे यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले असून, या कार्याबद्दल देवरुखवासीयांमध्ये प्रशांत यादव दिलदार व कार्यतत्पर वृत्तीचे कौतुक होत आहे.
“15 वर्षांची इच्छा प्रत्यक्षात येऊन आता भक्तांना पावसाच्या झळा सहन कराव्या लागणार नाहीत,” असे भावपूर्ण उद्गार भक्तांनी काढले आहेत. हा उपक्रम देवरुखमधील सामाजिक ऐक्य व साहाय्यतेचा एक उत्तम नमुना ठरला आहे.