दिपक शिंदे 9970406816
दसपटी विभागातील कळकवणे गावांमध्ये श्री.रामचंद्र पाडेकर यांच्या बकऱ्या वाघाने फस्त केल्या…संध्या वाघाने थैमान घातले आहे… दसपटी विभागातील सर्व गावांमध्ये फिरत आहे रात्री उशिरा रस्त्यावर फिरत असतो..या विभागात एम्.आय.डी.सी आहे येथुन जाणारे कामगार वर्ग खुप असतो . संध्याकाळी काळोख झाला कि सुरुवात होते तो अगदी रात्रभर कुठे ना कुठे प्रत्येक व्यक्ती किंवा शेतकरी यांची जनावरे फस्त करत फिरत आहे.हे गेली तीन चार महिने चालुच आहे दसपटी विभागातील कित्येक ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी यांनी लेखी व तोंडी वनविभागाला कळवले परंतु त्यांचा कोणत्याही प्रकारचे उत्तर किंवा कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही… कळकवणे गावांमध्ये भगवान गमरे यांची गाय व आज श्री.रामचंद्र पाडेकर यांच्या चार ते पाच शेळ्या वाघाने खाल्या आहेत… शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न पडला आहे… वन्य प्राणी रस्त्यावर का उतरत आहे यावर पण अंकुश असणे गरजेचे आहे…या गोष्टीची लवकरच वनविभागाने दखल न घेतल्यास दसपटी विभागातील शेतकऱ्यांची जनावरे घेऊन वनविभागाच्या दरवाज्यावर सर्व शेतकऱ्यांची जनावरे बांधून आंदोलन करण्यात येईल…असे कळकवणे ग्रामपंचायत सदस्य श्री.महेश शिंदे (एम्.डी.) यांनी वनविभागाला इशारा दिला आहे…

