दिपक शिंदे 9970406816
वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या सहकार भवन बहादूरशेख नाका येथील शॉपीचे उद्घाटन संपन्न
चिपळूण मधील कोकणातील लोकप्रिय वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टच्या ३५ व्या चिपळूण मधील सहकार भवन बहादूरशेख नाका येथील वाशिष्टी शॉपीचे उद्घाटन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते रामनवमीच्या शुभमुहूर्तावर झाले.

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे चेअरमन प्रशांत यादव, सौ स्मिताताई चव्हाण, मुख्य प्रवर्तक सौ.स्वप्ना यादव, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक सोमा गुडेकर, अशोक साबळे. सत्यवान म्हामुणकर, रमण डांगे,सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, अँड.नयना पवार, स्वामींनी यादव, प्रसाद यादव,प्रशांत वाजे,अविनाश गुडेकर, महेंद्र खेतले, संदीप पाटील,प्रशांत पवार,गणेश कदम,शशांक मोहिते,वाशिष्टी डेअरीचे मॅनेजर प्रदीप मगदूम आदी मान्यवर यावेळी उपास्थित होते. शाखेच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवशीच ग्राहकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती तर वाशिष्टी डेअरीने नुकतेच सुरू केलेल्या विविध प्रकारच्या आईस्क्रीमला ग्राहकांची चांगलीच पसंती दिसली. आईस्क्रीम,दूध दही श्रीखंड, आम्रखंड, ताक, गाई व म्हैस तूप, पनीर तसेच दुग्धजन्य असंख्य पदार्थ वाशिष्टी शॉपीमध्ये विक्रीस उपलब्ध करण्यात आले आहेत.