Deepak R. Shinde 9970406816
- पाणी समस्या असल्यास तत्काळ प्रस्ताव करा
चिपळूण पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीत आमदार शेखर निकम यांच्या ग्रामपंचायतींना सूचना
प्रतिनिधी चिपळूण
गतवर्षी काही ग्रामपंचायतींनी पाणी समस्येबाबत परिपूर्ण प्रस्ताव दिलेले नसल्याने त्याची कामे मंजूर झाली नाहीत, त्यामुळे यावर्षी ज्या गावात पाण्याची अडचण आहे. विहिरी, बोअरवेलची आवश्यकता आहे, अशा ग्रामपंचायतींनी तातडीने प्रस्ताव पंचायत समितीत सादर करावेत, अशा सूचना आमदार शेखर निकम यांनी सोमवारी येथे तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवकांना दिल्या.
देव्ययील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आमदार शिवाजी यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पाणी टंचाई कृती आराखडा, बैठक झाली. या बैठकीत तालुक्यातील सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी पाणी टंचाई विषयाची माहिती दिली. या बैठकीच्या विमित्ताने आमदार निकम यांनी
चिपळूण: पंचायत समितीमध्ये आयोजित पाणी टंचाई कृती आराखडा बैठकीत बोलताना आमदार शेखर निकम, सोबत प्रवीण लोकरे, उमा घारगे पाटील, प्रतिक झिंगे आदी.
तालुक्यातील ग्रामपंचायतींसमोर वृक्ष लागवडीचा विधायक उपक्रम मांडला. ते म्हणाले, येत्या पावसाळ्यात सर्व ग्रामपंचायतींनी किमान ५०० झाडे लावण्याचे नियोजन करावे. वृक्ष लागवडीसाठी देशी रोपांची निवड करावी. अनेक ग्रावात शासकीय जागा पडिक आहेत. रस्त्याच्या दुतर्फा रोपांची लागवड करावी. वृक्ष लागवडीचा हा उपक्रम केवळ फोटोसेशनपुरता मर्यादीत राहू,नये, असा टोला लगावताना गतवर्षी लावलेली झाडे किती जगली, याचाही मागोवा घ्या, केवळ कागदोपत्री ही मोहीम राबवू नये. यात अनेक अडचणी येतील. मात्र त्यावर मार्ग काढून पुढे जाण्याची भूमिका सर्वांनी स्वीकारायला हवी. सर्वाधिक झाडे लावून त्यांचे जतन करणाऱ्या ग्रामपंचायतींना सन्मान केला ‘जाणार असल्याचेही स्पष्ट केले.दरम्यान, मोकाट गुरांमुळे वृक्षलागवडीला खीळ बसत असल्याचे काही सरपंचांनी नमूद केले असता त्यावर निकम यांनी, वृक्ष लागवड करुन त्याचे जतन करण्यासाठी अडचणी येणारच आहेत. त्यावर मात करुन पुढे जाण्याची भूमिका स्वीकारायला हवी. गुरांपासून रोपांचे संरक्षण होण्यासाठी बांबूपासून ट्री गार्ड तयार करावे. हे काम कमी खर्चात होईल. एखाद्याच्या वाढदिवसानिमीत्त ५ ते १० ट्री गार्ड भेट स्वरुपात घ्यावेत.
- ग्रामपंचायतींसमोर वृक्षलागवडीचा प्रस्ताव
- झाडे जतन करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सन्मान
- असे उपाय सूचवताना पावसाळ्यात लागवड होण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करावेत. याकामी संस्था, मंडळे, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनाही सामावून घ्यावी. वृक्ष लागवडीसाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहन केले.यावेळी तहसीलदार प्रवीण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घारगे-पाटील, पाणी पुरवठा उपअभियंता प्रतिक झिंगे, शाखा अभियंता दीपक गवस, महावितरणचे पाटणकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे रवींद्र जाधव यांच्यासह तालुक्यातील संबंधित खात्याचे प्रशासकीय अधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.