दिपक शिंदे 9970406816
चिपळूण नागरीच्या कर्मचाऱ्यांच्या शाखातंर्गत ३० एप्रिल व १ मे रोजी क्रिकेट स्पर्धा
संस्थापक चेअरमन सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते होणार उद्घाटन
क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी
चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा अंतर्गत क्रिकेट स्पर्धा दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील होणार असून ही स्पर्धा ३० एप्रिल व १ मे रोजी चिपळूण नगर परिषदेच्या पवन तलाव मैदानावर प्रकाशझोतात होणार असून या स्पर्धेचे उद्घाटन ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता संस्थेचे संस्थापक चेअरमन सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेत चिपळूण नागरी च्या शाखांतर्गत संघांसह १६ संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे व आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्ताने दि. ३० एप्रिल व १ मे २०२५ रोजी या कालावधीत ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेचे उद्घाटन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेत संस्थेच्या शाखांतर्गत संघांसह १६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
यामध्ये रॉयल चॅलेंजर मध्य विभाग, सह्याद्री इलेव्हन पूर्व विभाग, डायमंड इलेव्हन फायटर, योद्धा इलेव्हन, योद्धा उत्तर विभाग, वाशिष्टी इलेव्हन, पत्रकार इलेव्हन, लगान इलेव्हन फायटर, राजधानी इलेव्हन पश्चिम महाराष्ट्र, संचालक इलेव्हन, चिपळूण राईजर, चिपळूण फिटनेस क्लब इलेव्हन, चिपळूण नागरी इलेव्हन, चिपळूण वकील संघ, वाशिष्ठी डेअरी इलेव्हन या संघांचा समावेश आहे.
या स्पर्धा क्रिकेट क्षेत्रातील क्रिडापटुना व क्रिकेटची आवड असणाऱ्या क्रिडा रसिकांना एक प्रकारचे आकर्षण असेल. या स्पर्धा चिपळूण नगरपालिकेच्या पवन तलावावरील स्टेडीअमवर ३० एप्रिल व १ मे रोजी दोन दिवस ही स्पर्धा प्रकाशझोतात होणार असून रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहेत. विजेत्या संघाला व उपविजेता संघाला आकर्षिक शिल्ड देण्यात येणार आहे. संस्थेच्या नाविन्यपुर्ण उपक्रमास क्रिडा रसिकांनी व संस्थेच्या चाहत्यांनी उपस्थित राहुन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन चिपळूण नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाने केले आहे.