दिपक शिंदे : चिपळूण || काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील बडगुंड येथे आज सकाळी एका मजुराची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी गुलमर्ग येथे लष्कराच्या गाडीवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तर दोन पोर्टरांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले आणि कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे. या भागात काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. आजच्या दिवसात लागोपाठ दोन दहशतवादी हल्ले.