दिपक शिंदे :9970406816
आम्ही महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांना भरघोस मतांधिक्य देणार – महाविकास आघाडी वालोपे चिपळूण –
वालोपे येथे चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. प्रशांत यादव यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी प्रशांत यादव यांना गावातून प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार केला.
घरोघरी जात पदाधिकारी आणि कार्यकर्ते, ग्रामस्थांना तुतारी चिन्हासमोरील बटण दाबून मविआचे उमेदवार प्रशांत यादव यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन करीत आहेत. या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे पेढे जिल्हा परिषद विभाग प्रमुख सचिन शेटे, विभाग संघटक रोशन आंब्रे, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष प्रवीण आग्रे, माजी सरपंच विलास पवार, शिवसेना ठाकरे गटाचे युवा उपविभाग प्रमुख नाना तांबिटकर उपशाखाप्रमुख प्रकाश नलावडे प्रचाराचा शुभारंभ करताना पदाधिकारी व कार्यकर्ते.
गोरिवले, जितेंद्र आयरे, राजेंद्र गोरीवले, आबा गोरीवले, संदेश आयरे, सुनिल आग्रे, बंटी मयेकर, सचिन देवळेकर, गणेश रेवाळे, गणेश शिर्के, संदीप तांबिटकर, संदेश शिगवण, दीपक कदम, राजा सोलकर यांच्यासह मविआचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे नेते रमेश कदम, सौ. स्वप्ना यादव-यांनी वालोपे येथे भेट देत सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. वालोपेतील मविआ कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.